राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार, नाईक पिता-पुत्राचा भाजपमध्ये प्रवेश

1535

नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री गणेश नाईक, त्यांचे सुपुत्र, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह सुमारे 50 नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. नाईक यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेपूर्वी मोठा धक्का बसला आहे.

शरद पवारांची ऑफर धुडकावली, गणेश नाईकांचे नाय… नो… नेव्हर

काँग्रेसला मोठा धक्का, हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

बुधवारी सायंकाळी नवी मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नाईक पिता-पुत्राने भाजपचा झेंडा हाती घेतला. नाईक पिता-पुत्राने भाजपमध्ये प्रवेश केल्याने नवी मुंबईत भाजपची ताकद वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या