
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने
आज पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.
सांगलीतील महात्मा गांधी पुतळ्याजवळ काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवकचे शहर-जिल्हाध्यक्ष राहुल पवार, अविनाश पाटील, पद्माकर जगदाळे, शेखर माने, गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक विष्णू माने, शेडजी मोहिते, नर्गिस सय्यद, स्वाती पारधी, शिवाजी दुर्वे, अभिजित पाटील, संतोष पाटील, मयूर पाटील, फिरोज पठाण, सागर घोडके उपस्थित होते.
नगर शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीच्या वतीने मूक सत्याग्रह करण्यात आला. आंदोलकांनी तोंडाला काळ्या मुखपट्टय़ा, तर दंडाला काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध केला. यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, रेश्मा आठरे, अंजली आव्हाड, अशोक बाबर, अमित खामकर, ऍड. योगेश नेमाणे, अजय दिघे, फारूक रंगरेज, अब्दुल खोकर, लहू कराळे, गणेश बोरुडे, अनिकेत येमुल सहभागी झाले होते. पाथर्डीत शिवशंकर राजळे, भगवान दराडे, नासीर शेख, राधाकिसन आठरे, बंडू बोरुडे, सीताराम बोरुडे, गहिनीनाथ शिरसाठ आदी कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांना निवेदन देत या प्रकरणाचा निषेध केला.
सांगोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा जयमाला गायकवाड, तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, शहराध्यक्ष तानाजी पाटील, शिवाजी बनकर, अनिल खडतरे, सोमनाथ लोखंडे उपस्थित होते. शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा निषेध करीत फलटण बंद आणि उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्याचा निर्णय श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी आमदार दीपक चव्हाण, सुभाष शिंदे, संजीवराजे नाईक-निंबाळकर, माणिकराव सोनवलकर, मिलिंद नेवसे उपस्थित होते.






























































