न्यायलयाने फटकारल्यानंतर राजिनामा मंजूर करणे हे सरकारी यंत्रणेला अशोभनीय – सुनील तटकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत जे झालं ते सरकारी यंत्रणांना शोभत नाही. त्यांना निवडणुक लढण्यापासून रोखणं हे असंस्कृतपणाचं लक्षण आहे. न्यायलयाने फटकारल्यानंतर राजिनामा मंजूर करायला सांगणं हे सरकारी यंत्रणेला अशोभनीय आहे, असे मत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीबाबत सुनील तटकरे यांनी ऋतुजा लटके यांचाच विजय होईल असा विश्वास वयात केला आहे. महाविकास आघाडीचा पाठिंबा पाहता ऋतुजा लटके ही निवडणूक एकतर्फी जिंकतील, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला आहे.