
सोलापूर जिह्यातून सध्या सहा महामार्ग कनेक्ट झाले असून, आणखी एक महामार्ग सूरत-चेन्नई होत आहे. तसेच, सोलापूर-धाराशिव हा रेल्वेमार्ग देखील होणार आहे. दरम्यान, महामार्ग होऊनही अनेक वाहने शहरातूनच जातात. शहरातून जाणारी जड वाहतूक कायमची बंद व्हावी आणि जड वाहनांच्या सोयीसाठी आता शहराबाहेरून 60 किलोमीटरचा रिंगरोड होणार आहे. उत्तर सोलापूर क दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावे त्याला जोडली जातील. त्याचाही फायदा उद्योजकांना होणार आहे. जागेच्या मोजणीचे पत्र राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने भूमिअभिलेख कार्यालयाला दिले आहे. मोजणीनंतर गावे निश्चित होतील आणि त्यानंतर भूसंपादन होईल, असे वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.
सोलापूर जिह्यातील महामार्गांची कनेक्टीव्हिटी वाढली असून, मुंबई, पुण्यानंतर आता सोलापूर जिह्यात नव उद्योगांना मोठा वाव आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसीतील जागा उद्योगांनी व्यापली असून, चिंचोली एमआयडीसीतील जागादेखील संपली आहे. तेथे आता विस्तारासाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे मंद्रूप व पंढरपूर एमआयडीसीचा प्रस्ताव प्रादेशिक कार्यालयाकडून महाव्यवस्थापकांकडे पाठविण्यात आला आहे. कर्षभरात भूसंपादन सुरू होईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे.
जिह्यातून सध्या सोलापूर-विजयपूर, सोलापूर-अक्कलकोटमार्गे पुढे कर्नाटक, सोलापूर- तुळजापूर (येडशी), सोलापूर-पुणे, सोलापूर-सांगली, सोलापूर-हैदराबाद हे मार्ग गेले आहेत. आता सूरत-चेन्नई महामार्ग प्रस्तावित असून, त्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही लकवरच सुरू होईल. सोलापूर-धाराशीव रेल्वेमार्गदेखील होणार आहे. आगामी काळात विमानसेवादेखील सुरू होईल. त्यामुळे भविष्यात
यामुळे सोलापूर जिह्यातील तरुणांच्या हाताला काम मिळावे, या हेतूने पंढरपूर-मंगळकेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आकताडे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पंढरपूर एमआयडीसीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. दुसरीकडे मंद्रूप येथे एमआयडीसी व्हावी, यासाठी माजी मंत्री दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी पाठपुरावा करीत आहेत. आगामी वर्षभरात दोन्ही एमआयडीसीचा विषय मार्गी लागू शकतो.






























































