
जपानमध्ये सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानने पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. हिंदुस्थानचा आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने शनिवारी सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकला.
दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फिल्डमध्ये हिंदुस्थानचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. तसेच टोकियो ऑलिम्पिकमधील हे हिंदुस्थानचे सातवे मेडल आहे. याआधी लंडन ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानने 6 मेडल जिंकण्याची कामगिरी केली होती.
IT’S JAVELIN GOLD FOR INDIA @Neeraj_chopra1 is the #Tokyo2020 javelin champion with 87.58m!
He becomes the first Indian athlete in history to win an #Olympics title in #athletics pic.twitter.com/YEj5IaL8ML
— World Athletics (@WorldAthletics) August 7, 2021
तत्पूर्वी हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर भाला फेकून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले होते. नीरजची ही कामगिरी ‘अ’ व ‘ब’ या दोन्ही गटांतून अव्वल ठरली होती. शनिवारी 7 ऑगस्टला झालेल्या अंतिम फेरीतही त्याने दणदणीत कामगिरी करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.
Tokyo Olympic बजरंगाची कमाल! कांस्यपदकावर मोहोर; हिंदुस्थानच्या झोळीत सहावे मेडल
दुसरेच सुवर्णपदक
दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तीक सुवर्णपदक जिंकण्याची हिंदुस्थानची ही फक्त दुसरीच वेळ आहे. याआधी अभिनव बिंद्रा याने 2008 ला झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 10 मी. हवाई रायफल नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर आता नीरज चोप्रा याने भालाफेकमध्ये अशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.





























































