‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री जाणार बिग बॉस मराठीच्या घरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन चांगलाच रंगत आहे. या घरात दोन आठवड्यांपूर्वी आदिश वैद्य वाईल्ड कार्ड म्हणून गेला होता. मात्र दोन आठवड्यातच आदिशचा घरातील प्रवास संपला. आता या विकेंडच्या एपिसोडमध्ये आणखी एक वाईल्ड कार्ड घरात प्रवेश करणार असून ती एक अभिनेत्री आहे. तिच्या एन्ट्रीचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

हिंदी व मराठी मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री नीता शेट्टी ही बिग बॉसमध्ये झळकणार आहे. नीताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे देखील बिग बॉसचा लोगो पोस्ट केला सोबत आय एम वेटिंग असे लिहले होते. कलर्स वाहिनीने देखील इंस्टाग्राम पेजवर व्हिडीओ शेअर केला. यात बिग बॉसच्या स्टेजवर एन्ट्री डान्स करताना दिसत आहे.