
जोगेश्वरी पूर्वेतील प्रभाग क्रमांक 76 मधील मजास नाल्यावरील नेमाणी ब्रिज आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. ही ब्रिज जोगेश्वरी स्टेशन आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने या पुलाचे काम होणे अत्यंत गरजेचे होते. जुन्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबून आसपासच्या परिसरातील घरात शिरत असल्याने त्या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी व्हावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून आजपासून हा पूल रहदारीसाठी खुला झाला आहे.
मजास नाल्यावरील नेमाणी पूल हा 50 ते 60 वर्ष जुना असल्याने तो जीर्ण झाला होता. तसेच त्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबून ते पाणी हजारो नागरिकांच्या घरात पाणी शिरत होते. तसेच पुलाच्या वरून पाणी वाहत
असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी शिवसेनेचे तत्कालीन माजी नगरसेवक राजेश्वर रागिणवार यांच्यासह रघुनाथ चव्हाण, अनंतराव भोसले, मंजिरी परब, प्रवीण शिंदे, सुरेश गांगण या नगरसेवकांनी ब्रिजची पुनर्बांधणी व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी अनेक पाहणी दौरे आणि संयुक्त बैठक करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली होती.
पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावे आणि स्थानिकांना दिलासा मिळावा यासाठी शिवसेना नगरसेविका लोना रावत यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे अखेर या पुलाचे काम पूर्ण झाले असून आज आमदार अनंत (बाळा) नर यांच्या हस्ते त्या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश मुसळे, स्थानिक नगरसेविका लोना रावत, नगरसेविक कैलासनाथ पाठक, मानसी जुवाटकर, पूल विभागाचे संजय पवार, विभाग संघटिका शालिनी सावंत, विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत, उपविभाग प्रमुख बाळा साटम, जयवंत लाड, विधानसभा समन्वयक महेश गवाणकर, उत्तरा नायर, शाखाप्रमुख प्रदीप गांधी, नंदू ताम्हणकर, संजय सावंत, शाखा संघटक सुचित्रा चव्हाण, रश्मी गोडंबे, युवसेनेच्या मानसी गोडंबे, शाखा समन्वयक अंकुश मोर्वेकर, मधुकर जुवाटकर, साक्षी पाडावे, प्रियांका आंधळे आदी उपस्थित होते.






























































