मी पंतप्रधान होईन असे वाटले नव्हते- पंतप्रधान नरेंद्र मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजपासून वीस वर्षांपूर्वी जनतेची सेवा करण्यासाठी जवाबदारी मिळाली होती, पुढे मी कधी पंतप्रधान होईल वाटले नव्हते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. तसेच जनतेने मला खूप प्रेम दिले हे माझे सौभाग्य असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. उत्तराखंडमध्ये ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजच्याच दिवशी 20 वर्षापूर्वी जनतेची सेवा करण्यासाठी मला एक जवाबदारी मिळाली. जनसेवेचे कार्य माझ्या आयुष्यात अनेक दशकं सुरू होती. परंतु 20 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदची जवाबदारी मिळाली. मुख्यमंत्री म्हणून मला लोकांनी खूप प्रेम दिले. पुढे आयुष्यात मी कधी तरी पंतप्रधान होईन असा विचारही कधी केला नव्हता. जनतेच्या प्रेमाने आपण भारावून गेल्याचेही त्यांनी नमूद केले.