दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘क्विल’ अभ्यासात मदत करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवावी लागली. घरून ऑनलाईन शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी शिक्षणाची घडी बिघडल्याचं चित्र पाहायला मिळालं. आता यावर उपाय म्हणून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने एक अनोखा उपक्रम राबवला आहे.

शैक्षणिक आयुष्यात निर्णायक ठरणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने प्रश्नसंच प्रकाशित केले आहेत. परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, याची कल्पना विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

परीक्षेला जेमतेम सवा महिना उरलेला आहे आणि प्रश्नांची उत्तरे शोधताना विद्यार्थ्यांची तारांबळ उडू नये म्हणून क्विल नावाच्या अॅप्लिकेशनची मदत होणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT) ने हा उपक्रम राबवला आहे. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना याबाबत मदत करण्याच्या उद्देशाने मुंबई स्थित टार्गेट प्रकाशनाने या प्रश्नपेढीतील प्रश्नांची उत्तरे तयार केली असून ती प्रकाशनाच्या ‘Quill – The Padhai App’ या ॲपवर अपलोड करण्यात आली आहेत.

या ॲपच्या माध्यामातून दहावी व बारावीचे सर्व विद्यार्थी व शिक्षक या प्रश्न पेढीतील प्रश्नांची उत्तरे कोणत्याही शुल्काविना मोफत मिळवू शकतात. मुंबईतील महानगर पालिकेच्या सर्व शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना हे ॲप मोफत देण्यात येत आहे.

तसेच Quill – The Padhai App हे गूगल प्ले स्टोअर व ॲप स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.