
सीमेपलीकडून हिंदुस्थानात घुसखोरी करीत आणि कश्मीर खोऱ्यात तळ ठोकत जिहादी धमाके आणि कारवाया करणाऱ्या लश्कर ए तोयबा व जैश ए मोहम्मदसह 42 दहशतवादी संघटनांवर केंद्र सरकारने बंदी टाकल्याची माहिती सरकारने लोकसभेत मंगळवारी दिली. केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार 2018 ते 2020 या दोन वर्षांच्या कालावधीत जम्मू-कश्मीरात सुरक्षा बलांनी केलेल्या जोरदार कारवायांत 635 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. केंद्राने ‘यूएपीए’ कायद्यांतर्गत 42 दहशतवादी संघटनांवरील प्रतिबंध कायम ठेवले आहेत. गेल्या दोन वर्षांत हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवरून 61 तर हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवरून 1045 घुसखोरीच्या घटना घडल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी विशेष प्रश्नोत्तराच्या तासांत दिली.



























































