ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणाऱ्या नेमबाजांचे लसीकरण करा

हिंदुस्थानात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घेऊन राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) यांच्याकडून केंद्र सरकारकडे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणाऱ्या नेमबाजांचे लसीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. अर्थात ही लस खेळाडूंच्या मर्जीवर अवलंबून असेल. पण केंद्र सरकारने पुढाकार घेतल्यास या लसीचे महत्त्व खेळाडूंना पटेल. त्यामुळे सर्व खेळाडू लसीकरणासाठी तयार होतील असे एनआरएआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या