
अभिनेता सलमान खानचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ चे शूटींग पूर्ण झाले आहे. यावर्षी ईदचे औचित्य साधून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट नेमका कशाबद्दल आतापर्यंत निर्मात्यांनी चित्रपटाशी संबंधित बहुतांश माहिती गुप्त ठेवली असून, फक्त काही लूक्स आणि टिझर प्रदर्शित केले आहेत. त्यामुळे चित्रपटाबद्दल सलमानच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर आदींच्या भूमिका आहेत.






















































