विनोदाच्या आरशात सासू, सुनांची भांडणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका खोडकर सुनेच्या आणि तिच्या खोडीवर कुरघोडी करणाऱया खटय़ाळ मिस्कील सासूमधल्या नात्याची खुमासदार गोष्ट म्हणजे ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई’. यामध्ये आजच्या आधुनिक काळात सासू-सुनेमधील नाते, एकमेकाRशी कधी भांडत तर कधी एकमेकीना चिमटे काढत कसे बहरत जाते याचा धमाल प्रवास मालिकेत पाहायला मिळेल. मालिकेत खटय़ाळ सासूच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी, तर खोडकर सून साकारतेय स्वानंदी टिकेकर.
घराघरात घडणाऱया सासू-सुनांच्या भांडणांना विनोदाच्या आरशात बघण्याची संधी ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई’ मालिकेतून प्रेक्षकांना मिळणार आहे. 21 नोव्हेंबरपासून ही मालिका झी मराठीवर सुरू झाली आहे.