
सामना ऑनलाईन । नागपूर
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या 19 व 20 जानेवारी रोजी नागपुरात आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात होणार असून अधिवेशनासाठी या सभागृहाला राजश्री शाहू महाराज समता परिसर असे नाव देण्यात येणार आहे.
या अधिवेशनासाठी देशभरातून 5 हजार प्रतिनिधी येणार असून त्यात खासदार, आमदार, राष्ट्रीय पदाधिकारी व प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहेत. या अधिवेशनाचे औचित्य साधून येत्या 20 जानेवारी रोजी दुपारी 4 वा. कस्तुरचंद पार्प येथे भाजपाध्यक्ष अमित शाह विशाल रॅलीला संबोधित करतील.






























































