
निधी चाफेकरांनी व्यक्त केल्या भावना, ‘अनब्रोकन’ च्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन
22 मार्च, 2016… तो खरंच एक दुर्दैवी दिवस होता… ब्रुसेल्सहून नेवार्कला जाणाऱया विमानात केबिन-क्रू-मॅनेजरची जबाबदारी निधी चाफेकर यांच्यावर होती. त्या दिवशी दहशतवाद्यांनी ब्रुसेल्स विमानतळावर बॉम्बस्पह्ट घडवून आणला. या हादरवून टाकणाऱया हल्ल्यात 32 जणांचे प्राण गेले आणि तीनशेहून अधिक लोक जखमी झाले. निधीसुद्धा या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाल्या. स्फोटानंतर काही मिनिटांनी टिपण्यात आलेला त्यांचा फोटो या दहशतवादी हल्ल्याचा जणू चेहराच झाला.
निधी चाफेकर यांच्या आयुष्याचा आणि फ्लाइट अटेन्डन्ट म्हणून त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणारी हृदयद्रावक कथा ‘अनब्रोकन’ या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आली आहे. या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच मुंबई प्रेस क्लब येथे पार पडला. काैन्सुल जनरल ऑफ बेल्जियम टू मुंबई मिस्टर फ्रँक गिरकेन्स हे या कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रक होते.
यावेळी लेखिका निधी चाफेकर यांनी या भयंकर घटनेला उजाळा देत आपण या संकटातून कसे बाहेर आलो, याची सत्य कथा सांगितली. या हल्ल्यात निधी 25 टक्क्यांहून अधिक भाजल्या गेल्या. त्यांच्या अनेक हाडांचा अक्षरशः भुगा झाला. कानांचे पडदे फाटले आणि सलग तेवीस दिवस त्यांना इन्डय़ुस्ड कोमात राहावं लागलं. त्यांच्यावर वीसहून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यांना विस्मरणाचाही त्रास होऊ लागला; पण तरीही जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी यांच्या जोरावर; पती-मुले आणि कुटुंबीय व मित्रांच्या प्रोत्साहनाने त्या ताठ कण्याने उभ्या राहिल्या. निधीचा हा जगण्याचा लढा ‘अनब्रोकन’ पुस्तकात वाचावयास मिळेल.
परिस्थिती कितीही विपरीत असली तरी त्यावर मात करण्याची क्षमता माणसात आहे, हा चिरकाल टिकणारा सकारात्मक संदेश देणारी ही कथा लाखो लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल, असा आशावाद निधी चाफेकरांनी व्यक्त केला.
पुस्तकाच्या अनुवादिका डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके, मंजुल पब्लिशिंग हाऊसचे संपादक चेतन कोळी उपस्थित होते.




























































