
>> निळकंठ कुलकर्णी ([email protected])
।। श्री गुरुदेव दत्त ।।
।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।
प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या काही प्रतिमा आपण पाहतो वंदन करतो. त्यामध्ये स्वामी महाराजांची दंड कमंडलू कौपिन छाटी धारण केलेली भस्म विभूषित एक उभी प्रतिमा आहे. या उभ्या प्रतिमेत महाराजांच्या गळ्यात एक श्लोकबद्ध हार आहे. इ.स १९१३ मध्ये वैशाखात श्री गुळवणी स्वामी महाराज श्री क्षेत्र गरूडेश्वरी आले येताना त्यांनी श्री दीक्षित स्वामी महाराज यांनी रचना केलेल्या हार बद्ध व थोरले महाराजांना अर्पण केले. श्री थोरल्या स्वामी महाराजांनी ते श्लोकबद्ध हाराचे चित्र पाहिले व त्याचा स्वीकार करून श्री दीक्षित स्वामी महाराजांना वर करणेस सांगितले तो श्लोक खालील प्रमाणे..
मेशं केशं सुशंभु भुवन वन वहं
मारहं रत्न रत्नं ।
वंदे श्री देवदेवं सुगुण गुरू गुरुं
श्रीकरं कंजकंजम् ।
मामज्ञ मत्तमर्भ भवदव सुवहं
वासना सर्व संघे ।
मात: पात: सुतस्ते वहरहसिहरे
देशिके शिष्य शिष्य ।।
१. मेशं – लक्ष्मीचा ईश अर्थात विष्णू
२. केशं – ब्रह्म जो सृष्टीकर्ता आहे
३. सुशंभु – मोक्षाचे सुख देणारा शंभु
४. भुवन वन वहं – १४ भुवनांचा पालन करणारा विष्णू
५. मारहं – कामदेवाला मारणारा अर्थात शिवस्वरुप
६. रत्नरत्न – श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ अर्थात प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज
७. श्री देवदेवं – देवांचा जो देव तो महादेव, भगवान श्री शंकर
८. सगुणगुरूगुरुं – सगळ्या गुरूंचा गुरू म्हणजे सगुण परमेश्वर
९. श्रीकरं – वेदवेदांत विद्या शिकवून शिष्याना तेजस्वी बनवणारा
१०. कंजकंजम् – करकमळात कमंडलू धारण करणारा
११. मामज्ञ – अज्ञ मा वहं म्हणजे अज्ञानी अशा मला ब्रह्माकडे घेऊन जावे
१२. मत्तमर्भ -अर्थात मद मोहग्रस्त बालकास
१३. भवदव सुवहं – संसाररुपी दावानलातुन बाहेर नेणारा
१४. वासनासर्व संघे – वासनांच्या जाळ्यात
१५. मात: पात: – तुझा पुत्र आहे, माझे पतन न होवो.
१६. शिष्य शिष्य – शिष्यांचा शिष्य
सरळ अर्थ :
“श्रीविष्णू श्रीब्रह्मदेव व श्री शंकर अशा त्रिमूर्तीस्वरूप असलेल्या चतूदर्श भुवने व वेद धारण करणाऱ्या, मदनालाही लाजवनाऱ्या, जितेंद्रिय रत्नांमध्ये अर्थात पुरुषश्रेष्ठमध्ये श्रेष्ठ व तेजस्वी असलेल्या, ज्ञानी व गुणसंपन्न अशा श्रीगुरूंचेही श्रीगुरु असणाऱ्या, भक्तांना सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्रदान करणाऱ्या ,हातात दंडकमंडलू धारण करणाऱ्या आणि कमलाप्रमाणे प्रसन्न मुखकमल असेलेल्या हे देवाधीदेवा! हे गुरुमाऊली!! मी आपल्याला वंदन करतो. हे प्रभो ! मी सर्व वासनांच्या समूहात सापडलेलो असून संसाररूपी अग्नीत पोळून त्रस्त झालो आहे. मी माझे या भावनांनी मी उन्मत झालो आहे. हे देवा! मी अज्ञानी बालक आहे. याकरिता हे सद्गुरो आपल्या शिष्यानशिष्याचा यापुढे अध:पात होऊ नये म्हणून आपण ज्ञान देऊन माझा उद्गार करावा.




























































