राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत मुंबईच्या नीलांशला विजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय कॅरम स्पर्धेच्या मुले एकेरीच्या विविध तीन गटांतील (14, 17 व 19 वर्षांखालील मुले) विजेतेपद अनुक्रमे मुंबईचा नीलांश चिपळूणकर, अमीन अख्तर अहमद व प्रथम करिहार (नागपूर) यांनी  पटकावले. या स्पर्धेला मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, संभाजीनगर, लातूर, पुणे व यजमान कोल्हापूर विभागातील विविध जिल्हय़ांतून 200 खेळाडू, मुले व पंच यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

मुले एकेरीच्या 14 वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीच्या तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत मुंबईच्या वनिता विश्राम हायस्कूल, खेतवाडीचा खेळाडू नीलांश चिपळूणकरने मुंबईच्याच मिहीर शेखचा 4-25, 25-4, 25-8 असा पराभव करून विजेतेपदावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले.