रस्त्याबरोबर मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमचा सोडवू – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संतोष भोसले, गेवराई

मराठवाड्याचा विकास रस्त्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे मराठवाड्याच्या रस्ते विकासासाठी 61 हजार कोटींची मंजुरी दिलेली आहे, परंतु रस्ते विकास करत असताना मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवू, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

गडकरी आचार संहिते अगोदर नागपुरातील विविध उद्घाटने करण्यात व्यग्र आहेत. त्यामुळे आज दुपारी बारा वाजता गेवराईच्या कार्यक्रमास त्यांनी व्हिडीओ कॉन्फरसद्वारे जनतेला संबोधित करत महामार्ग क्र 211चे उद्घाटन झाल्याचे त्यांनी जाहीर केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, जायकवाडी धरण 40 टक्केच्या वर जात नाही, नदी जोडप्रकल्पामुळे आगामी काळात धरण 80 टक्के भरेल व मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटेल त्यांची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची आणि माझी आहे, असं गडकरी यावेळी म्हणाले.

gadkari-gevrai09-03

इथेनॉलपासून बायोप्लास्टिक निर्मिती करून गाव व शेतकरी रोजगारामुळे समृद्ध होईल. येडशी व संभाजीनगर महामार्गाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री पकंजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. प्रीतम मुंडे, आमदार लक्ष्मण पवार, जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस, संगीता ठोंबरे, आर. टी. देशमुख, भीमराव धोंडे जिल्हापरिषद अध्यक्ष सविता गोल्हार, रमेश आडसकर, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, आदींची उपस्थिती होती,