केंद्रीय मंत्रीमंडळात प्रातिनिधीक सहभाग नको; नितीशकुमार यांची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

दिल्लीत राजभवनाच्या प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 58 मंत्र्यांनी गुरुवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. मोदी 2.0 च्या मंत्रिमंडळात एनडीएमधील घटक पक्षांना स्थान देण्यात आलेले असले तरी, नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने मात्र या नव्या मंत्रीमंडळात सहभागी होण्यास नकार दिला आहे. मात्र, एनडीएत कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला मंत्रिमंडळात प्रातिनिधीक सहभागाची गरज नाही. घटक पक्षांनी मिळवलेल्या जागांनुसार मंत्रिपद देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी शुक्रवारी पाटण्यात जाहीर केले की, जेडीयू नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात सहभागी होणार नाही. या निर्णयाबाबत बोलताना नितीशकुमार यांनी म्हणाले की, “मंत्रीमंडळातील सहभागाबद्दल कोणताही फॉर्मूला ठरलेला नव्हता, 29 मे रोजी झालेल्या बैठकीत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी एनडीएच्या घटक पक्षांना एक-एक मंत्रीपद देण्यात येईल असे सांगितले होते. एका मंत्रीपदाचा विषय जेव्हा आला, त्याचवेळी मी सांगितले की, आम्हाला त्याची काही गरज नाही”. जेडीयूच्या कोअर कमेटीनेही सांकेतीक भागीदारीची गरज नसल्याचा निर्हीणय घेतला.

“सरकार स्थापनेबाबत मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, कुणाला मंत्री बनवायचे की नाही हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. भाजप पुर्ण बहुमतात आहे. त्यामुळे कुणाला मंत्री बनवायचे हा त्यांचा अधिकार आहे, जेडीयूने 3 मंत्रीपदाची मागणी केल्याचे वृत्त चूकीचे असल्याचे सांगून मंत्रीमंडळात सहभागी होणे गरजेचे नाही”.असे नितीशकुमार म्हणाले. तसेच “आम्ही यापुढेही सांगणारही नाही व बैठकीलाही जाणार नाही ” असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बोलणे झालेले नाही. मात्र अमित शाह आणि भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा झाली. अटलविहारी वाजपेयी मंत्रीमंडळातील सहभागाबाबत सर्व घटक पक्षांसोबत बोलत असत, असेही त्यांनी सांगितले.