रवी शास्त्री यांचा कार्यकाल विश्वचषकापर्यंतच! विंडीज दौर्‍यापूर्वी मिळणार  नवे प्रशिक्षक

61

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

‘टीम इंडिया’ची अलीकडच्या काळातील कामगिरी उल्लेखनीय झाल्याने मुख्य प्रशिक्षक आणि सहाय्यकांच्या करारात काढ होणार असल्याची चर्चा होती, मात्र हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि प्रशासकीय समिती यांच्यातील बैठकीत प्रशिक्षक कायम ठेवण्याबाबतचा कोणताच प्रस्ताव मांडण्यात आला नाही. त्यामुळे इंग्लंडमध्ये 30 मे ते 14 जुलैदरम्यान होणार्‍या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर ‘टीम इंडिया’ला नवीन प्रशिक्षक व नवीन प्रशिक्षक स्टाफ मिळणार आहे. याचाच अर्थ ‘टीम इंडिया’चे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाल विश्वचषक स्पर्धेपर्यंत राहणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

रवी शास्त्री यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा करार जुलै महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येणार आहे. ‘टीम इंडिया’ने मायदेशासह परदेशदौर्‍यावरही जबरस्त कामगिरी केल्याने रवी शास्त्री यांच्यासह सहाय्यक स्टाफचाही करार वाढविण्यात येईल अशी चर्चा होती, मात्र ‘बीसीसीआय’च्या बैठकीत रकी शास्त्री यांच्या कराराचा मुद्दा चर्चिला गेलेला नाही आणि तो चर्चेचा अजेंडात नक्हता असे बीसीसीआयच्या करिष्ठ अधिकार्‍याने स्पष्ट केले. त्यामुळे किश्वचषक स्पर्धेनंतर नकीन प्रशिक्षक निकडीच्या प्रक्रियेला सुरुकात होणार आहे. विद्यमान प्रशिक्षक व सहाय्यक स्टाफ यांना मुदतवाढ मिळणार नसून इच्छा असल्यास या सर्वांना नवीन निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागेल अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली.

विश्वचषक स्पर्धेनंतर वेस्ट इंडीजमध्ये कसोटी चॅम्पियनशिप  होणार आहे. या दरम्यानच्या कमी कालावधीत प्रशिक्षकपदासाठीची शोधमोहीम राबवायची आहे. विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघाची कामगिरी कशी होते यावरही बरेच काही अवलंबून असेल. कारण विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर विंडीज दौर्‍यापूर्वी नवीन प्रशिक्षकाची शोधमोहीम पूर्ण झाली नाही, तर रवी शास्त्री यांचा विंडीज दौर्‍यापर्यंत कार्यकाल वाढवला जाऊ शकतो. शास्त्री यांच्या कार्यकाळात ‘टीम इंडिया’ने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात कसोटी मालिकेत हरविण्याचा पराक्रम केलेला आहे. शिवाय दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड दौर्‍यावरही एकदिवसीय मालिका जिंकून क्रिकेटविश्वात ‘टीम इंडिया’चा दबदबा निर्माण केला आहे. इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानने उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला तरी रवी शास्त्री यांचे पारडे पुन्हा जड होऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या