मुंबईत दिवसभर सूर्यदर्शन नाही थांबून थांबून पावसाची हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आज मुसळधार नसला तरी पावसाने थांबून थांबून हजेरी लावली. ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांना आज सूर्यदर्शन झालेच नाही. पावसामुळे उपनगरातील काही भागांमध्ये वाहतूक मंदगतीने होत होती अशी माहिती मिळाली.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज सांताक्रूझ येथे 95.2 मिलीमीटर तर कुलाबा येथे 62.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पहाटेपासून पावसाने अधूनमधून कधी जोरदार तर कधी तुरळक सरींसह हजेरी लावली. सकाळी साडेआठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत पश्चिम उपनगरांतील मालवणी, कांदिवली, दिंडोशी आणि वर्सोवा या भागांमध्ये तर पूर्व उपनगरात विक्रोळी येथे 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबईच्या इतर भागांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पावसामुळे जोगेश्वरी, अंधेरी आणि पूर्व उपनगरांतील मुख्य रस्त्यांवर वाहतूक मंदावल्याचे चित्र होते.

मुंबईत पुढील तीन दिवस पाऊस जोर धरेल, अशी शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मात्र आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर मदतकार्य वेगाने व्हावे म्हणून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना तैनात ठेवण्यात आले आहे.