
सामना ऑनलाईन । हरयाणा
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटाने समाजात अनेक चांगले बदल घडवले. हरयाणातील सिरसा जिल्ह्यातील गोडीकान गावातील पंचायतीनेही याच चित्रपटावरून प्रेरणा घेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या गावातील घरांमध्ये टॉयलेट नाही अशा गावात आम्ही आमच्या मुली देणार नाही, असा निर्णय एकमताने गोडीकान गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे. यासाठी त्यांनी ८ जूनला शपथही घेतली आहे.
गोडीकान गावातील सगळ्याच घरांमध्ये टॉयलेट आहेत. त्याचा आदर्श दुसऱ्या गावांनीही घ्यावा यासाठीच हा निर्णय घेतल्याचे गावातील पंचायतच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही पंचायतीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.


























































