महिना 2 लाख पगार असलेल्या मॅनेजरची आर्थिक तंगीतून आत्महत्या; पत्नी व मुलीचा गळफास

9936

एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मॅनजरने मेट्रोसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. पतीच्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या पत्नीने मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या केली. भरत (31), जयश्री (5) आणि शिवरंजनी (31) अशी मृतांची नावे आहेत. दिल्लीतील सेक्टर 128 मधील जे.पी. पवेलियन कोस्टजवळ हे कुटुंब राहात होते.

भरत दिल्लीतील कालिका मंदिराजवळ असणाऱ्या गोविंदपुरी येथे खासगी कंपनीमध्ये जनरल मॅनेजरच्या पदावर कार्यरत होते. त्यांना महिना जवळपास 2 लाख पगार होता. पगार मोठा असला तरी शौकही जास्त असल्याने हा पैसा पुरत नव्हता. त्यामुळे आर्थिक तंगीत आलेल्या भरत यांना मेट्रोखाली उडी घेऊन आत्महत्या केली. आर्थित तंगीतूनचही ही आत्महत्या केल्याचे भरत यांचे वडील सुब्रह्मण्यम यांनी पोलिसांना सांगितले.

आत्महत्येची माहिती आधी पोलिसांनी मृताचा भाऊ कार्तिक याला दिली. कार्तिकने भरत यांची पत्नी शिवरंजनी यांना भाऊ रस्ते अपघातामध्ये जखमी झाला असून त्यांच्यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शिवरंजनी यांना पतीन मृतावस्थेत दिसून आल्याने त्यांनी संतुलन गमावले. सायंकाळी मुलीसह फ्लॅटवर गेल्यानंतर तिने आधी मुलीला फासावर लटकवले आणि दुसऱ्या रूममध्ये जावून स्वत: गळफास घेत आत्महत्या केली.

मृताचा भाऊ कार्तिक याने वहिनीच्या मोबाईलवर फोन केला असता तो बंद असल्याचे आढळले. संशय आल्याने त्याने पोलिसांना याची माहिती दिली.पोलिसांनी फ्लॅटवर जावून पाहिले असतो तो आतून बंद असल्याचे दिसून आले. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता बेडरूममध्ये चिमुरडीचा आणि दुसऱ्या रूममध्ये तिच्या आईचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आला.

आपली प्रतिक्रिया द्या