‘रील्स’ एडिट करणे झाले सोपे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानामध्ये टिकटॉक बॅन झाल्यानंतर इन्स्टाग्रामच्या रील्स या शॉर्ट व्हिडीओ मेकिंग अॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. फेसबुकची मालकी असलेल्या इन्स्टाग्रामने व्हिडीओ एडिटिंगसाठी नुकतेच तीन नवीन टुल्स लाँच केले आहे. सुपरबीट, डायनेमिक लिरिक्स आणि थ्रीडी लिरिक्स हे नवीन टुल्स शुक्रवारपासून दाखल झाले आहेत. यामुळे क्रिएटर्सना रील्सवर म्युझिक आणि एआर इफेक्ट एकत्र करणे सोपे होणार आहे. कंपनीने म्हटलेय, लोक मनोरंजनासाठी मजेशीर व्हिडीओ बनवतात, परंतु व्हिडीओ एडिटिंगसाठी मेहनत घ्यायची त्यांची तयारी नसते. त्यामुळे आम्ही हे खास इफेक्ट्स लाँच केले आहेत जे संगीताच्या आधारावर ऑटोमॅटिक रील एडिट करतील.