
जायफळमुळे आपल्या तोंडाची दुर्गंधी दूर करता येते हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु याच जायफळचा उपयोग आरोग्यासाठी देखील तितकाच महत्त्वाचा मानला जातो. जायफळ हा हिंदुस्थानासह जगभरात वापरला जाणारा एक लोकप्रिय मसाला आहे. त्याच्या अनेक गुणधर्मांमुळे तुमच्या आरोग्यावर आणि त्वचेवर उल्लेखनीय परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.
जायफळचा वापर मसालेदार पदार्थांपासून ते मिष्टान्नांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये होतो.
किंचित तिखट आणि नटयुक्त चव असलेले, जायफळ मायरिस्टिका फ्रॅग्रॅन्स झाडाच्या फळापासून मिळते. त्यात शक्तिशाली संयुगे असतात जे रोगांना प्रतिबंधित करण्यास आणि एकूण आरोग्य राखण्यास मदत करतात. जायफळ त्वचेचे आरोग्य सुधारण्यापासून ते तोंडाची दुर्गंधी दूर करण्यापर्यंत आणि जळजळ आणि वेदना कमी करण्यापर्यंत अनेक प्रकारे फायदेशीर आहे.
जायफळ आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. ते मूड वाढवण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी देखील प्रभावी आहे, म्हणून ते तुमच्या आहारात संतुलित प्रमाणात समाविष्ट केले पाहिजे. सर्दी आणि खोकल्यासाठी जायफळ अत्यंत फायदेशीर आहे. फार पूर्वीपासून जायफळचा वापर लहान मुलांसाठी केला जात असे. तसेच आजही जायफळ हे लहान मुलांना दुथातून देतात. यामुळे रक्तसंचय दूर होतो.
जायफळाचा त्वचेवरही आश्चर्यकारक परिणाम होतो. जर तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर जायफळ पावडर कच्च्या दुधात किंवा गुलाबजलात मिसळून लावा किंवा दगडावर बारीक करून पेस्ट बनवा. आठवड्यातून तीन वेळा ते लावल्याने काही दिवसांत चांगले परिणाम मिळतील. त्यामुळे पिंपल्सपासून सुटका होण्यासही मदत होते. जायफळ फक्त १० ते १२ मिनिटे चेहऱ्यावर ठेवावे.
त्वचा मऊ मुलायम होण्यासाठी स्वस्त आणि मस्त केळ्याचा वापर करायलाच हवा
रात्री दोन चिमूटभर जायफळ पावडर कोमट दुधात मिसळून प्यायलात तर रात्रीची चांगली झोप येते आणि ताण कमी होतो. काही संशोधनात असे दिसून आले आहे की जायफळाचे गुणधर्म मूड वाढवतात. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म वेदना आणि कडकपणा कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे तुम्हाला आराम मिळतो.
जायफळ खाणे केवळ फायदेशीर नाही तर त्याचे तेल देखील फायदेशीर आहे. जर तुम्हाला तुमच्या सांधे किंवा स्नायूंमध्ये वेदना आणि सूज येत असेल तर तुम्ही जायफळ तेल लावू शकता. संधिवाताचा त्रास असलेल्यांसाठी हे फायदेशीर ठरू शकते. जायफळ पावडरची पेस्ट तुम्ही तिळाच्या तेलात मिसळून लावू शकता.
तोंडाची दुर्गंधी किंवा हिरड्यांमध्ये वेदना आणि सूज येत असेल तर तुम्ही जायफळ देखील वापरू शकता, कारण त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत. यावर उपचार करण्यासाठी, तुम्ही जायफळ पावडर किंवा अर्कपासून बनवलेले माउथवॉश वापरू शकता. पर्यायी म्हणून, तुम्ही जायफळाचे छोटे तुकडे चोखू शकता. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास देखील मदत होईल. जायफळातील तेल हिरड्यांमधील वेदना आणि सूज कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.

























































