चाकणकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; चार जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील मजूकर प्रसारित करण्यात आला. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. रुपाली चाकणकर यांच्या बाबतीत एक अश्लील पोस्ट विकास सावंत, जयंत पाटील, रणजीतराजे हात्तींबरे, अमोल के. पाटील यांनी फेसबुकवर शेअर केली होती. रुपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बबन बोराटे यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात यासंबंधीची तक्रार दिली होती.