साईचरणी पावणेआठ लाखांचे चांदीचे सिंहासन, फ्रेम व पाट अर्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । शिर्डी

नोएडा येथील देणगीदार साईभक्त प्रशांत श्रीवास्तव यांनी 7 लाख 74 हजार 72 रुपये किमतीचे चांदीचे सिंहासन, फोटो फ्रेम व पाट साईचरणी अर्पण केला आहे. या वस्तूंचे वजन 21 किलो 502 ग्रॅम इतके आहे. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी विधिवत पूजा केली. यातील सिंहासन व फोटो फ्रेमचा वापर समाधी मंदिरातील श्रींच्या फोटोकरिता करण्यात येणार असून पाटाचा वापर मंदिरातून दर गुरुवारी निघणाऱ्या पालखीतील पादुका व सटका ठेवण्यासाठी करण्यात येणार आहे.