
ग्राहक कोणत्या कंपनीचा फोन वापरतो यावरून कॅबचे भाडे ठरवले जात नाही, असे स्पष्टीकरण कॅब ऑग्रिगेटर ओला आणि उबर यांनी आज दिले. केंद्र सरकारने भाडे आकारण्याच्या मुद्दय़ावरून या कंपन्यांना नोटीस बजावली होती. आयफोन आणि अँड्रॉईड या फोनवर कॅब बुक करताना वेगवेगळे भाडे दाखवत असल्याची तक्रार होती. यावर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने स्पष्टीकरण मागवले होते. दरम्यान, या कंपन्यांनी ही चुकीची समजूत दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.