
सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करू अशी वृद्धाला धमकी देऊन पैसे उकळू पाहणाऱया चौघांना खार पोलिसांनी अटक केली. त्या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना केअर टेकर महिलेची गरज होती. त्यामुळे त्याने एका संस्थेला संपर्क केला. आठ दिवसांपूर्वी एक तरुणी त्याच्याकडे केअर टेकर म्हणून कामाला आली. कामाची गरज असल्याने तिला तक्रारदार याने नोकरीस ठेवले. त्या दिवशी ते रात्री फोनवर बोलत होते तेव्हा त्या तरुणीने तक्रारदाराला यांना बेडरूममध्ये येण्यास सांगितले. मात्र, तक्रारदारांनी नकार दिला. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने घरमालकाने तरुणीला कामावरून काढले. मात्र, कामावरून काढल्यानंतर तिने आणि त्यांच्या मित्रांनी फोन करुन त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना बेडय़ा ठोकल्या.



























































