पवईत वृद्धेची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

42
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । मुंबई

पवईच्या हिरानंदानी येथील नोरिटा इमारतीत राहणाऱ्या 71 वर्षीय वृद्धेने 19 व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. मृदुला भट्टाचार्य असे त्यांचे नाव होते. नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

हिरानंदानीतील नोरिटा इमारतीत मृदुला या त्यांचा मुलगा, सून व नातवांसह राहत होत्या. आज सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी 19 व्या मजल्यावरून खाली उडी टाकली. सकाळी पावणेनऊच्या सुमारास जेव्हा वॉचमन इमारतीखाली गस्त घालत होता तेव्हा मृदुला या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. त्यानंतर वॉचमनने लगेच ही बाब त्यांच्या कुटुंबीयांना कळवून मृदुला यांना रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला यांना मृत घोषित केले.

आपली प्रतिक्रिया द्या