
हिंदुस्थानची महिला कुस्तीपटू विनेश पह्गाट हिच्यानंतर बॉक्सर अमित पांघल यालाही टोकियो ऑलिम्पिकमध्ये अक्वल मानांकन मिळाले आहे. ऑलिम्पिकमध्ये अक्वल मानांकन मिळालेला अमित पांघल हा पहिलाच हिंदुस्थानी बॉक्सर होय.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अमित पांघलला 52 किलो गटात अक्वल मानांकन दिले आहे. आशियाई अजिंक्य पद स्पर्धेच्या अंतिम लढतीत अमित पांघलला उझबेकिस्तानच्या शखोबिद्दीन जोइरोवविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. मात्र या लढतीतील गुणावरून मोठा वाद झाला होता. ऑलिम्पिकसाठी 52 किलो गटात बिलाल बेनामा (फ्रान्स), मोहम्मद फ्लिसी (अल्जेरिया), हू जियांगुआन (चीन), शखोबिद्दीन जोइरोव (उझबेकिस्तान) यांना अनुक्रमे 2 ते 5 मानांकन देण्यात आले आहेत. अमित पांघलने या पाच बॉक्सरपैकी बिलाल व जियांगुआन यांना याआधीही हरविलेले आहे. याचबरोबर जोइरोवविरुद्ध त्याला मागील तीन लढतींत हार पत्करावी लागलेली आहे. अमित पांघलचे हे पहिलेच ऑलिम्पिक असणार आहे. मात्र तरीही हिंदुस्थानला त्याच्याकडून पदकाची आशा आहे.
बॉक्सिंगचे पथक सर्वात मोठे
ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे सर्वात मोठे पथक बॉक्सिंग खेळाचे आहे. अमित पांघलसह हिंदुस्थानचे नऊ बॉक्सर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. क्रीडा विश्वातील या सर्वोच्च स्पर्धेसाठी सहा वेळची जगज्जेती मेरी कोम हिला 51 किलो गटात सातवे मानांकन, 60 किलो गटात सिमरनजीत काैरला चौथे, 69 किलो गटात लवलिना बोर्गोहेनला 5वे, तर 75 किलो गटात पूजा रानीला 8वे मानांकन आहे. पुरुष गटात पांघलशिवाय 63 किलो गटात मनीष काwशिकला 18वे, 69 किलो गटात विकास यादवला 10वे, 75 किलो गटात आशीष कुमार चौधरीला 9वे, तर 91 किलो गटात सतीश कुमारला 9वे मानांकन देण्यात आले आहे.

























































