पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तूल, दोन काडतुसे जप्त करण्यात आली. प्रथमेश दिनेश पांचाळ (वय 21, रा. गणेशनगर,धायरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पांचाळ सराइत गुन्हेगार आहे. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल असून तो धायरी- नऱ्हे रस्त्यावर थांबल्याची माहिती सिंहगड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, कुलदीप संकपाळ, मोहन भुरूक, आबा उत्तेकर, शंकर कुंभार, सचिन माळवे यांच्या पथकाने केली.