बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्याला चतुःश्रृंगी पोलिसांकडून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेकायदेशिररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतुस असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. पंकज अभिमन्यु रणवरे (वय 35, रा. डॉ. आंबेडकरनगर, बाणेर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अमलदार श्रीकांत वाघवले यांनी तक्रार दिली आहे.

बाणेर परिसरातील साईनाथनगरमध्ये एकजण पिस्तूल घेउन थांबल्याची माहिती चतुःश्रृंगी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून पंकज रणवरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 20 हजारांचे गावठी पिस्तूल आणि काडतुस असा ऐवज जप्त करण्यात आला. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांच्या पथकाने केली.