दादरच्या फुल मार्केट मध्ये गोळ्या झाडून एकाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

दादरच्या फुल मार्केट मध्ये एका इसमाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मनोज मौर्य असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असून तो फुल मार्केटमध्ये इलेक्ट्रीक वजन काटा पुरवण्याचे काम करायचा. गजबजलेल्या फुलमार्केटमध्ये गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

शुक्रवारी सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात मारेकऱ्यांनी मौर्य याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्याचा मौर्य गंभीर जखमी झाला होता. यावेळी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी त्याला तत्काळ केईएम रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दादर पोलिसांकड़ून अधिक तपास सुरू आहे.