कर्तव्यने जिंकली ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा

श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशपांडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयडियल स्पोर्टस् अॅपॅडमीतर्फे पार पडलेल्या अखिल हिंदुस्थानी पातळीवरील खुल्या मोफत प्रवेशाच्या ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत गुजरातच्या कर्तव्य अनाडकटने साखळी 10 गुणासह विजेतेपद पटकाविले. इन्स्टिटय़ूट फॉर चेस एक्सलंट व मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना सहकार्याने रंगलेल्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित बुद्धिबळपटूंसह विविध राज्यातील 308 खेळाडूंनी भाग घेतला.

बापूसाहेब देशपांडे स्मृती ऑनलाइन खुली विनाशुल्क बुद्धिबळ स्पर्धा स्विस लीग पद्धतीने लीचेस प्लॅटफॉर्मवर संपन्न झाली. स्पर्धेमध्ये तामीळनाडूच्या राम एस. पृष्णनने (9 गुण) द्वितीय, आसामच्या मयांक चक्रबोर्तीने (9 गुण) तृतीय, कोलकाताच्या सुभायान पुंडूने (9 गुण) चौथा, मुंबईच्या आकाश दळवीने (9 गुण) पाचवा, मुंबईच्या गोपाळ राठोडने (8.5 गुण) सहावा, बिहारच्या देवी दयाळ सिंघने (8 गुण) सातवा, कोलकाताच्या राजदीप सरकारने (8 गुण) आठवा, सांगलीच्या अभिषेक पाटीलने (8 गुण) नववा तर आसामच्या अजेद्रेसिस्टाने ( 8 गुण) दहावा क्रमांक पटकावला. संयोजक शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त लीलाधर चव्हाण व मुंबई शहर बुद्धिबळ संघटनेचे सेव्रेटरी राजाबाबू गजेंगी यांच्या पुढाकाराने खेळविण्यात आलेली ही स्पर्धा 11 साखळी फेऱयांमध्ये रंगली.

आपली प्रतिक्रिया द्या