
नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशीही विधिमंडळ परिसरात विरोधक राज्यातील वाढती बेरोजगारी, पेपरफुटी, पदभरती प्रश्नावर आक्रमक झाले. विरोधकांनी विधानभवन परिसरात मोर्चा काढत “नुसत्या घोषणा आणि जाहिराती कधी होणार पद भरती”, “सरकार देतंय आश्वासने खोटी, प्रत्येक परीक्षेत पेपरफुटी”, म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर वडे तळत बेरोजगारांची थट्टा करणाऱ्या सरकारविरोधात “बेरोजगारी वाढली, काय दिवे लावले”, “भरतीची घोषणा, काय दिवे लावले”, “उच्चशिक्षित तरुणांची थट्टा करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”, “बेरोजगारांना पकोडे तळा म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”, “शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे”, अशा घोषणा देत सरकार विरोधात निदर्शने केली.
हिवाळी अधिवेशन दिवस सातवा
वाढती बेरोजगारी, पेपरफुटी, तरुणांना केंद्रांकडून खोटी आश्वासने, पीएचडीधारकांची थट्टा आदी मुद्द्यांवर आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आम्ही आमदारांनी जोरदार आंदोलन करत केले.
#हिवाळीअधिवेशन#शिवसेनाउबाठा#महाविकासआघाडी#नागपूर pic.twitter.com/HYffTJc5Go— Ambadas Danve (@iambadasdanve) December 15, 2023
नागपूर येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले.
View this post on Instagram
“एक दिवा खोक्यानी दुसरा दिवा धोक्यानी”, “नुसत्या घोषणा आणि जाहिराती कधी होणार पद भरती”, “सरकार देतय आश्वासने खोटी, प्रत्येक परीक्षेत पेपरफुटी”, “का होतेय पेपरफुटी क्या यही है मोदी की गॅरंटी?”, ” सरकारनं दिला युवकांना धोका म्हणून काढलाय भरतीचा ठेका”, अशा विविध घोषणा लिहिलेले काळे फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला.































































