धाराशिव जिल्ह्यात कोरोनाचा कहर, 36 तासात 32 जण दगावले

धाराशिव जिल्ह्यात सध्या कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. गेल्या 36 तासात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोरोनाने 23 तर सारी या आजाराने 9 जण दगावले आहेत. स्मशानभूमीत मृतदेहांचा खच साचला होता. दिवसभर चिता जळत होत्या.

जिल्ह्यात आत्तापर्यंत 691 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. हा आकडा दररोज झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दुकानाच्या वेळही बदलल्या आहेत. अत्त्याआवश्यक सेवेची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळात सुरू असणार आहेत.

मृतांचा आकडा वाढत चालला असून स्मशानभूमीत सात ते आठ तासांची वेटिंग करावी लागत असून प्रथमच स्मशानभुमीत आक्रोश नाही तर स्मशान शांतता दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या