माधुरी आली माहेरी, ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ झाले सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखेर मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘प्लॅनेट मराठी’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आज मराठमोळी बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या विशेष उपस्थितीत ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या ऍपचे शानदार लाँचिंग झाले. यानिमित्ताने ‘माधुरी आली माहेरी’ अशी चर्चा रंगली.

माधुरीच्या हस्ते ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे लोकार्पण झाले. यावेळी ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘म’ या लोगोची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माधुरी या ओटीटीशी जोडली गेली. या कार्यक्रमाला ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्यासह अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, सचित पाटील, प्राजक्ता माळी, भार्गवी चिरमुले, सुशांत शेलार व अन्य कलाकार उपस्थित होते.

मराठी कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे हे ऐकून आई फार खूश झाली, असे माधुरीने कार्यक्रमात सांगितले. म… प्लॅनेट मराठीचा आणि म…मम्मीचा असे माधुरी म्हणाली.

  • येत्या वर्षभरात प्लॅनेट मराठीवर तब्बल 24 वेबसीरिज प्रेक्षकांना बघता येतील. सध्या 40 मराठी चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार असून पुढील तीन महिन्यांत ही संख्या तिपटीहून अधिक असेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.