
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ऑक्सफोर्ड डिक्शनरीत दोन हिंदुस्थानी शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच एक स्कॉटिश शब्दाचाही डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे. डिक्शनरीच्या पहिल्या आवृत्तीला ९० वर्ष पुर्ण होण्याच्या पार्श्वभुमीवर लोकांना नवीन शब्द सुचवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार डिक्शनरीत चड्डी, फंटूश आणि जिबॉन्स या शब्दांचा समावेश करण्यात आला आहे.
हिंदुस्थानमध्ये अंतरवस्त्रासाठी चड्डी हा सर्वमान्य शब्द आहे. बोलीभाषेत या शब्दाचा सर्रास वापर केला जातो. तसेच बीडी इन या स्कॉटिश शब्दाचाही डिक्शनीर समावेश केला आहे. विवाहेतर संबंधाला स्कॉटिश भाषेत बीडी इन म्हटले जाते
फंटूश या अजून एक हिंदुस्थानी शब्दचाही समावेश करण्यात आला आहे. फंटूश म्हणजे दिखावा करणारा किंवा भडकाऊ. हा शब्द स्कॉटिश भाषेतही वापरला जातो. भविष्यात अजून इतर नवे शब्द डिक्शनरीत समाविष्ट केले जातील असे शब्दकोशाच्या संपादकांनी म्हटले.


























































