कलम 370 चा धसका, पाकड्यांना वाटतेय युद्धाची भीती

608

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवून दोन महिने झाले आहेत. जम्मू-कश्मीरमध्येही सगळं आलबेल आहे. पण असे असले तरी 370 कलमाने पाकड्यांची मात्र झोप उडवली आहे.  हिंदुस्थान केव्हाही पाकिस्तानबरोबर युद्ध पुकारेल असे येथील नेते सतत बरगळत आहेत. यामुळे येथील 66 टक्के लोकांनी या कलमाचा धसका घेतला असून युद्ध होईल अशी भीती वाटत असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत.

‘रोजनामा पाकिस्तान’ च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. यात ‘गॅलप’ या संस्थेने आणि’ गिलानी पोल’ पाकिस्तानने 370 कलम आणि सध्याच्या हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणावावर स्थानिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी दोन्ही देशात कुठल्याही क्षणी यु्द्ध होण्याची शक्यता असल्याचे 66 टक्के नागरिकांनी सांगितले. तसेच या यु्द्धाच्या शक्यतेच्या भीतीने झोप उडाल्याचेही काही जणांनी यावेळी सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि इतर नेतेमंडळी ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता आजही वर्तवत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या