
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
पुढील वर्षी होणार्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद अखेर पाकिस्तानकडेच सोपवण्यात आले आहे. सिंगापूर येथे आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला. मात्र ताणलेल्या राजकीय संबंधामुळे गतविजेता हिंदुस्थानी संघ पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार नाही हे नक्की. याचबरोबर पाकिस्तानातील सुरक्षाव्यवस्थेच्या कारणांमुळे इतर देशही या स्पर्धेत सहभागी होणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाकिस्तानमध्ये 2009 साली श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर अतिरेकी हल्ला झाला होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये एकदाही द्विपक्षीय मालिका किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा झालेल्या नाहीत. सुरक्षेच्या कारणामुळे कुठलाही संघ पाकिस्तान दौर्यावर जाण्यासाठी धजावत नाही. गतवर्षी वेस्ट इंडीजने पाक दौर्यावर तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली होती, मात्र आशिया चषक स्पर्धेसाठी बहुतांश देश पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार देणार अशी सद्यस्थिती आहे. हिंदुस्थानने 2008 साली पाकिस्तानमध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. त्यानंतर मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमुळे हिंदुस्थानने पाकसोबत खेळण्यास नकार दिला. लाहोरमध्ये श्रीलंकन क्रिकेट संघावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2011साली हिंदुस्थानी उपखंडात झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या यजमानीतून पाकिस्तानचा पत्ता कट केला होता. त्यामुळे ही विश्वचषक स्पर्धा हिंदुस्थान, बांगलादेश व श्रीलंका या तीन देशांच्या संयुक्त यजमानीखाली झाली होती. शिवाय मध्यंतरी बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीनेही आयसीसीला पत्र लिहून दहशतकादाला खतपाणी घालणार्या देशांकर बंदी घालण्याची मागणी केली होती.
बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी सिंगापूरला झालेल्या बैठकीत हजर होते. या बैठकीत हिंदुस्थान-पाक यांच्यातील राजकीय संबंध न सुधारल्यास स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी हलकण्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे. याच बैठकीत 2022 आशियाई खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करावा याबद्दलही चर्चा करण्यात आली आहे. 2018 साली यूएईमध्ये पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत हिंदुस्थानने अंतिम फेरीत बांगलादेशवर मात करत विजेतेपद पटकावले होते. मात्र पाकिस्तानमध्ये होणार्या स्पर्धेत हिंदुस्थानसह किती संघ खेळण्यास नकार देतील आणि ही स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.




























































