
सामना प्रतिनिधी । परळी
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त परळीच्या गोपिनाथ गडावर मुंडे भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री, खासदार, आमदारांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना लोकनेत्याची कन्या आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जातीचे राजकारण करणाऱ्यांना जोरदार चपराक लगावली.
मुंडे भक्तांची गोपीनाथ गडावर गर्दी; मुख्यमंत्र्यासह केंद्रीयमंत्री, खासदार, आमदारांची उपस्थिती
मुंडे-विखे कुटुंबीयाचे ऋणानुबंध जुने – सुजय विखे-पाटील
देवेंद्र फडणवीस हे गोपीनाथ गडावर प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून येत असतात. पुढच्या वर्षीही फडणवीसच मुख्यमंत्री म्हणून कार्यक्रमाला येतील आणि यासाठी खारीचा वाटा मी उचलणार असल्याचे उद्गार पंकजा मुंडे यांनी काढले. काही जण मुंडे भगिनींबद्दल उलट्या चर्चा करतात, निकाल त्या चर्चेचा उलटा लागतो आणि त्याचा आम्हाला फायदा होतो, असे बोलत पंकजा मुंडे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तसेच जातीच्या शिड्या चढून राजकारणात वर गेलेल्यांना उत्तर म्हणजे देवेंद्र फडणवीस असल्याचे त्यांनी म्हटले.
























































