पुढं काय करायचं ते करूच, पंकजा मुंडे यांचा भाजपला सूचक इशारा

2578

‘मुंडे साहेब स्वाभीमानी होते. आता गोपीनाथ मुंडेंच्या नावाने पदर पसरणार नाही. आपल्या ताकदीवर गोरगरीबांची सेवा करणार’, असं सांगतानाच ‘पंकजा मुंडे बेईमान होणार नाही. पक्ष सोडणार नाही. पुढं काय करायचं ते करूच, पण भाजपने या सर्व परिस्थितीवर आत्मचिंतन करावं’, असा सूचक इशारा पंकजा मुंडे यांनी दिला आहे. ंमाझ्याकडे कुठलही पद नाही, पण मराठवाड्याचे प्रश्न मिटवण्यासाठी जनसेवा करण्यासाठी मी तयार आहे. मराठवाड्याला न्याय मिळेलेच कारण मुख्यमंत्री माझा भाऊच आहे, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

‘सत्तेत असताना माझ्या विरोधात बोलण्यासाठी काही माणसचं नेमली होती’, असा गंभीर आरोप देखील त्यांनी आपल्या भाषणातून केला. ‘माझ्या तुमच्याकडून अपेक्षा नाही, तर नाराज कशी आणि कुणावर व्हायचं’, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘माझ्या एका पोस्ट नंतर पंकजा मुंडे पक्ष सोडणार ही बातमी कुणी सोडली हे शोधून काढा’, असा इशारा देखील त्यांनी चंद्रकांत पाटीला यांना दिला.

तसेच आजपासून आपण भाजपच्या कोअर कमिटीची सदस्य देखील नाही, असं जाहीर करतानाच जानेवारीत राज्यभर दौरा करून 27 जानेवारीला लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

 • पंकजा मुंडे यांच्याकडून धनंजय मुंडेंना आशीर्वादसत्ता असताना बंधनं होती, आता मी मुक्त –
 • अमला पदाची लालसा नाही
 • मी पक्ष सोडणार नाही, पक्षाने काय तो निर्णय घ्यावा
 • पंकजा मुंडे शुन्यावर आली आहे, अशी कुणाचीतरी भावना
 • मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा
 • लवकरच राज्याचा दौरा करणार, पंकजा मुंडे यांची घोषणा
 • मुंबईत गोपीनाथ मुंडे सुविधा कार्यालय सुरू करणार
 • आता पक्षाच्या कामाला सुरूवात करणार
 • हा माझ्या बापाचा पक्ष
 • बेईमनी ही आमच्या रक्तातच नाही
 • मला कोअर कमिटीतून मूक्त करा
 • पक्ष कुणाच्याही मालकीचा नाही
 • पडल्यानंतरही पक्ष सोडून जावे अशी कोणाची अपेक्षा आहे?पंकजा मुंडे पक्ष सोडणार ही बातमी कोणी दिली, याचा शोध घ्या
 • माझी कुणाकडूनही अपेक्षा नाही
 • माझ्या रक्तामध्ये गोपीनाथ मुंडेंचे संस्कार
 • गोपीनाथ मुंडे यांनी खरच खंजीर खुपसले नाही – पंकजा मुंडे
 • माध्यमांच्या सुत्रांनाही मर्यादा
 • माझ्याबाबत चांगलं बोलू नये म्हणून काही लोकांना नेमले होते- पंकजा मुंडे
 • .खडसेंनी आपले मन मोकळं केले- पंकजा मुंडे
 • बोलण्यातून जखमा होतात, शब्द जपून वापरावे
 • खडसेंच्या तक्रारीची दखल घेतली जाईल-चंद्रकांत पाटील
 • जास्त बोललो तर शिस्तभंगाची कारवाई होईल, आधीच तिकीट कापले आहे – खडसे
 • माझ्याकडे भरपूर बोलायला आहे, परंतु वेळ नाही
 • नाथाभाऊची चूक काय? हे कळाले नाही
 • पाच वर्षात गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभे राहिले नाही
 • मुंडे अपघात योजना मी सुरू केली
 • पक्ष सोडून जाण्यास उद्युक्त केले गेले
 • माझा आधारस्तंभ नाही याची खंत
 • मुंडे साहेबांची आठवण आल्यास ओक्साबोशी रडावंसं वाटतं- खडसे
 • मी भाजपचा नाही, मी माझ्याच पक्षाचा- महादेव जानकर
 • पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले असून त्या गोपीनाथ गडावर पोहोचल्या आहेत.
 • या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे उपस्थित आहेत.
 • भाजपचे स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने गोपीनाथ गडावर कार्यकराचे अयोजन करण्यात आले आहे.
आपली प्रतिक्रिया द्या