परळीत येणारे मोदी दुसरे पंतप्रधान ठरणार, ‘या’ तारखेला घेणार सभा

11216

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रचार करणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींच्या 9 तर शहांच्या 18 सभा होणार आहेत. बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मगावात अमित शहा हे दसरा मेळाव्यासाठी येणार आहेत. तसेच 17 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी परळीत महायुतीच्या उमेदवारासाठी सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधानसभा२०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…

बीड जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. संभाजीनगर येथील बचत गटाच्या मेळाव्यात मोदी यांनी पंकजा मुंडे यांचे महिला सक्षमीकरणासाठी यांचे कौतुक केले होते. तेव्हापासूनच मोदी परळीत सभा घेतील असे बोलले जात होते.

याआधी पंतप्रधान म्हणून भाजपचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी परळीत आले होते. तद्नंतर मोदी हे परळीत येणारे दुसरे पंतप्रधान असतील. तसेच मोदी हे स्वतः शिवभक्त असल्याने त्यांनी प्रभू वैद्यनाथाच्या भूमीची सभेसाठी निवडली असल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या