फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला नातेवाईकांची मारहाण

फलटण उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील डॉक्टरला अज्ञात व्यक्तींनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. आईला उद्धट बोलल्याच्या कारणावरून ही घटना घडली असून, पोलिसांनी तत्काळ संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टर गायकवाड यांना पेशंटच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याच्या घटनेनंतर आरोग्यसेवेतील कर्मचाऱयांनी सामूहिक ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. या रुग्णालयातील महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्याप्रकरणी विधानसभेत चर्चा सुरू असताना आजच डॉक्टरला मारहाण केल्याने हे रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.