
महाराष्ट्र विघातक, कृत्य प्रतिबंधक अधिनियम (एमपीडीए) कायद्यात सुधारणा करून या कायद्याच्या कक्षेत खते-कीटकनाशक विक्रेते आणि उत्पादकांना आणण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना कृषी-रसायन उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱया क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडियाने विरोध दर्शवला आहे. क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष दीपक शहा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत कीटकनाशक उत्पादक आणि विक्रेत्यांची व्यापक बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावित निविष्ठा कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.






















































