पेट्रोल २६ तर डिझेल १९ पैशांनी स्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पेट्रोल-डिझेलच्या किमती आज सलग बाराव्या दिवशी कमी करण्यात आल्या आहेत. आज पेट्रोल २६ तर डिझेल १९ पैशांनी स्वस्त झाले. आतापर्यंत पेट्रोलच्या दरात १ रुपये ७४ पैशांची, तर डिझेलच्या किमतीत १ रुपया २९ पैशांची कपात करण्यात आली आहे. तरीही मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. मुंबईत ८४ रुपये ६१ पैसे प्रतिलिटर तर डिझेल ७२ रुपये ५१ पैसे प्रतिलिटर आहे. तर दिल्लीत सर्वात कमी दर आहेत. तेथे पेट्रोल ७६ रुपये ७८ पैसे तर डिझेल ६८ रुपये १० पैसे प्रतिलिटर असे दर आहेत.