Photo – देशभर आंदोलन पेटले! कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत झेन-जी रस्त्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

’नीट’चा पेपर फोडून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी आणि कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू केलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी देशभरातील तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. दिल्लीतील आंदोलनात हजारो तरुण सहभागी होत आहेत. तर देशातील मुंबई, ठाणे, रांची, थिरुवनंतपूरम, मदुराई, पाटणा, गुवाहाटी, प्रयागराज, अगरतळा, कोलकाता, चेन्नई यांसह अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी गुरुवारीसुद्धा उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. विद्यार्थ्यांचे आंदोलन कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पेटले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आणि पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याला न घाबरता सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.