बँकेतच पाकिट मारलं, चोर झाला गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

परळी वैजनाथ शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गर्दीचा फायदा घेत चोरट्यानं एका खातेदाराचं पाकिट मारलं. मात्र या खातेदाराला बराच वेळानंतर आपलं पाकिट मारल्याचं लक्षात आलं. तो पर्यंत पाकिट मार पसार झाला होता.

बँकच्या शाखेचे कामकाज सुरू असताना गर्दी झाली. अशा वेळी सुरक्षा रक्षकांचं लक्ष असतं. पण सगळ्यांच्या नजरा चुकवत पाकिटमाराने एका खातेदाराच्या खिशातून अलगदरित्या पाकिट काढलं आणि ते खातेदाराला किंवा अन्य लोकांना कळलं नाही. मग तो तिथून पसार झाला. पाकिटमारीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

आपले बँकेचे काम करण्यासाठी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील भाऊसाहेब सोमनाथ राडकर हे दुपारच्या सुमारास आले होते. आपले बँकेतील काम करत असताना त्यांच्या पाठीमागच्या खिशातील पाकिट ज्यात आठ हजार रुपये ठेवलेले होते.बँकेत असलेल्या गर्दीचा फायदा घेत राडकर यांचे आठ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. बँक अधिकाऱ्यांना तक्रार केल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात सगळा प्रकार उघडकीस आला.