पीव्हीआरमध्ये झळकणार ‘पिक्चर की चीर फाड’ चित्रपट मालिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शेमारू  एण्टरटेन्मेंट लिमिटेडच्यावतीने व्हीकेएएओच्या भागीदारीतून पिक्चर की चीर फाड ही बॉलीवूड चित्रपटांवर वेगळा दृष्टीकोन टाकणारी चित्रपट मालिका सादर होणार आहे. या चित्रपट मालिकेच्या माध्यमातून शेमारू नवा रोस्ट चित्रपट फॉर्मेट मोठ्या पडद्यावर आणत आहे. ही सिनेमालिका देशातील 20 शहरांमधील पीव्हीआरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या सीरिजमध्ये स्टॅण्डअप कॉमेडीयन गौरव कपूर आपल्या खास शैलीत बॉलीवूड चित्रपटांची समिक्षा करणार आहे. शेमारूचे सीईओ हिरेन गाडा यांनी सांगितले,‘बॉलीवूडच्या प्रवासात होत असलेले बदल या सीरिजमधून दाखविले जाणार आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा या सीरिजचा मुख्य उद्देश असून कोणाचीही भावना न दुखावता जुन्या चित्रपटांची समिक्षा केली जाणार आहे.